Home क्राईम सीईटी सेलच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा गैरव्यवहार?; उपमुख्यमंत्री, सायबर सेलकडे तक्रार

सीईटी सेलच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा गैरव्यवहार?; उपमुख्यमंत्री, सायबर सेलकडे तक्रार

1 second read
0
0
52

no images were found

सीईटी सेलच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा गैरव्यवहार?; उपमुख्यमंत्री, सायबर सेलकडे तक्रार

पुणे : सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी निविदा प्रक्रिया न राबवता वाढीव दराने जुन्याच खासगी कंपन्यांना कामाचे कंत्राट देण्यात आले. तसेच कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची माहिती विकण्यात आल्याचा आणि या प्रक्रियेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.
सीईटी सेलकडून तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी आदी विभागांच्या अंतर्गत असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण बावीस प्रवेश परीक्षांसह प्रक्रिया राबवली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी २६ मार्च २०२१ रोजी निविदा प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभाग घेतला. मात्र, एका विशिष्ट कंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येण्यासाठी सलग तीनवेळा निविदांना मुदतवाढ देण्यात आली. संबंधित कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर इतर कंपन्यांच्या सहाय्याने गेल्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.
कंत्राटाची रक्कम साधारण ४६ कोटी होती. तर यंदाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी निविदा प्रक्रिया न राबवताच पाच टक्के वाढीव दराने जूनमध्ये पुन्हा त्याच कंपन्यांना साधारण ५३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाचही कंपन्यांनी २८३ ते ४२४ रुपये आकारले. या सर्वांचा अतिरिक्त २७ कोटींचा भार सीईटी सेलवर पडला. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना विशिष्ट कंपनीसाठी वाढीव दराने कंत्राट मंजूर करण्यात आले. त्यातही कंपन्यांनी ‘सबटेंडरिंग’ करून दुसऱ्या कंपन्यांना काम दिले. त्यामुळे या प्रक्रियेत साधारण ५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केला.

Load More Related Articles

Check Also

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद     मुंबई,: म…