
no images were found
विमान प्रवासात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर होणार कठोर कारवाई|
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संसर्ग वाढत असल्याने एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात येणार असून नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता विमान वाहतूक नियामक DGCA ने जारी केलेल्या विमानांमध्ये प्रवाशांनी मास्क घालावेत याची खात्री करण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आलंय. त्यामध्ये सांगण्यात आलेय की, कोणत्याही प्रवाशाने सूचनांचं पालन न केल्यास विमान कंपनीकडून प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.