Home क्राईम नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

0 second read
0
0
167

no images were found

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

नाशिक : नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात बंदीवादी कैद्यांनी मोठा हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले. पोलीस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा कैद्यांनी मिळून जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर आता पोलिस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारागृहात आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या कैद्यांना पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये आणण्यात आले होते. आज सकाळी हा हल्ला झाल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्यानंतर पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या बंदीवादी कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर कोणत्या हेतूने हल्ला केलायं, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Load More Related Articles

Check Also

करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार

    करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार   कोल्हापूर, (प्रतिनिधी):– तत्त्वज्ञा…