Home मनोरंजन ‘जेता’ या चित्रपटातील गाण्याचे अनावरण खास. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते

‘जेता’ या चित्रपटातील गाण्याचे अनावरण खास. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते

1 second read
0
0
178

no images were found

जेताया चित्रपटातील गाण्याचे अनावरण खास. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘जेता’मधील ‘धाव मर्दा धाव…’ या गाण्याचे अनावरण झाले. जीवनाच्या या शर्यतीत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्वत:च्या नावाचा झेंडा फडकवायचा असतो, पण प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेणारेच या जगात यशस्वी होतात. समोर येणाऱ्या संकटांना पायदळी तुडवत इतिहास रचणाराच खरा ‘जेता’ बनतो. अशाच एका जेत्याची कहाणी प्रेक्षकांना ‘जेता’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘धाव मर्दा धाव…’ हे प्रेरणादायी गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहीर संजय यादव आणि सुप्रसिद्ध हॉटेल आराम रिजन्सीचे मालक रोहन विजय यादव यांच्या साथीने संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ‘जेता’ची निर्मिती केली असून दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील ‘धाव मर्दा धाव…’ या गाण्याचे अनावरण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या चित्रपटात एका तरुणाच्या दैवाशी संघर्षाची सत्यकथा पहायला मिळणार आहे. यावेळी ‘जेता’ चित्रपटाचे निर्माते संजय लक्ष्मणराव यादव व सहनिर्माते रोहन विजय यादव आणि मिहीर संजय यादव यांच्यासह सातारा विभागातील युवा उद्योजक प्रसन्न आवाडे उपस्थितीत होते. योगेश साहेबराव महाजन लिखित ‘धाव मर्दा धाव…’ हे गाणं संगीतकार कबीर शाक्य यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मराठी इंडियन आयडॉल’मध्ये फर्स्ट रनर-अप राहिलेला जगदीश चव्हाण याचा स्वर या गाण्याला लाभला आहे. अर्थपूर्ण शब्दरचा, लयबद्ध संगीत आणि सुरेल आवाज हे समीकरण जुळल्यानं ‘धाव मर्दा धाव…’ हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरणारं असल्याची भावना संजय लक्ष्मणराव यादव यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटामध्ये नीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहे. सिनेमॅटोग्राफी अनिकेत के. यांनी केली असून, संकलन हर्षद वैती यांनी केलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…