no images were found
हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित
मुंबई – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ आयोजकांनी रहित केल्याचे जाहीर केले. हा संघटित हिंदूंच्या सनदशीर मार्गाने केलेल्या प्रतिकाराचा विजय आहे. हा केवळ आरंभ आहे, देशातील ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली. समितीच्या या यशाबद्दल श्री. घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञताही व्यक्त केली.
मरीन लार्इन्स येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला. ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती. ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैशाचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.