Home मनोरंजन “आम्हांला 35 व्यक्तिरेखांसाठी कास्टिंग करावे लागले आणि हा आतापर्यंतचा आमचा सर्वांत कठीण अनुभव होता.” : सरगुन मेहता

“आम्हांला 35 व्यक्तिरेखांसाठी कास्टिंग करावे लागले आणि हा आतापर्यंतचा आमचा सर्वांत कठीण अनुभव होता.” : सरगुन मेहता

1 second read
0
0
47

no images were found

“आम्हांला 35 व्यक्तिरेखांसाठी कास्टिंग करावे लागले आणि हा आतापर्यंतचा आमचा सर्वांत कठीण अनुभव होता.” : सरगुन मेहता

झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांसमोर आणत आहे आणखी एक दमदार कथा, त्यांची आगामी मालिका ‘गंगा माई की बेटियाँ’सह. झी कन्नडच्या प्रशंसित ‘पुत्तकाना मक्कालु’वर आधारित ही मालिका गंगा माईच्या भावनिक प्रवासाचे दर्शन घडवते – एक आई, जिचा नवरा तिला मुलगा न झाल्यामुळे सोडून गेला, पण ती आपल्या तीन मुलींना ताकद, सन्मान आणि मोहकतेने वाढवण्याचा निर्णय घेते. ही कथा वाराणसीच्या भावपूर्ण पार्श्वभूमीवर साकारली गेली आहे. ही मालिका स्त्रियांच्या दृढतेचा आणि आई-मुलींच्या अविभाज्य नात्याचा उत्सव साजरा करते.

ड्रीमियाता चालवणाऱ्या निर्माती-अभिनेत्री सरगुन मेहता सांगते की ‘गंगा माई की बेटियाँ’ची खरी ताकद फक्त या मालिकेच्या भावपूर्ण कथानकात नाही, तर त्यातील व्यक्तिरेखांच्या विस्तीर्णतेत आणि सखोलपणात आहे. जवळपास 35 व्यक्तिरेखांची काळजीपूर्वक कास्टिंग सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली आणि ही मालिका तिच्यासाठी निर्माती म्हणून एक आव्हानात्मक पण समाधानी प्रवास ठरली आहे.

सरगुन मान्य करते की हा प्रोजेक्ट तिच्या हृदयाच्या जवळ आहे केवळ निर्माती म्हणून नाही तर कथाकथनकार म्हणूनही, कारण यातील प्रत्येक भूमिका, मग ती मोठी असो किंवा छोटी, ती तेवढ्याच प्रेम आणि महत्त्व देऊन तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे मालिकेची दुनिया खरोखरच प्रामाणिक आणि जिवंत वाटते.

ड्रीमियाताची निर्माती सरगुन मेहता म्हणाली, “टेलिव्हिजनवर अशा फार कमी मालिकाच असतात जिथे तुम्हांला अनेक व्यक्तिरेखा भेटतात, जिथे प्रत्येकाची स्वतःची वेगळी कथा आणि खोली असते. आम्हांला खास अभिमान आहे की ही मालिका विविध दृष्टिकोनातून तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती समृद्ध आणि अनेक स्तर असलेला अनुभव देते. आमच्याकडे जवळपास 35 व्यक्तिरेखांची कास्टिंग झाली जी आतापर्यंतची सर्वांत कठीण होती, सुमारे सहा महिन्यांचा काळ लागला, पण प्रत्येक भूमिकेसाठी, अगदी लहानसहान पात्रांसाठीही आम्हांला योग्य कलाकार सापडला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मालिकेची संपूर्ण दुनिया जिवंत वाटावी, फक्त मुख्य पात्रांपुरती मर्यादित नसावी हा त्यामागचा विचार होता. यातील अनेक कलाकार माझे आवडते आहेत आणि प्रत्येकवेळी त्यांचे सीन पाहताना मला हसू येते. मला उत्सुकता आहे की प्रेक्षकांनाही तसंच वाटेल की नाही. आम्ही सर्व खूप उत्साहात आहोत. आम्ही आमचे जीव की प्राण या मालिकेत ओतले आहेत; सर्वांना ही मालिका पाहायला मिळावी याची आतुरता आम्हांला खूप आहे!”

अनेक स्तर असलेल्या व्यक्तिरेखा, प्रामाणिक पार्श्वभूमी आणि भावपूर्ण कथानकासह ‘गंगा माई की बेटियाँ’ ही फक्त एक मालिका राहणार नाही; तर ती एक भावनिक सफर आहे जी प्रेक्षकांना हसवेल, रडवेल आणि विचार करायला लावेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…