Home Uncategorized उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी 19 जुलै 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करा – माहिती उपसंचालक प्रवीण टाके

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी 19 जुलै 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करा – माहिती उपसंचालक प्रवीण टाके

16 second read
0
0
34

no images were found

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी 19 जुलै 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करा – माहिती उपसंचालक प्रवीण टाके 

कोल्हापूर : प्रसार माध्यमातील प्रतिनिधी रोज समाजातील विविध पैलूवर लिखाण करीत असतात, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांवरही लिखाण करतात. या लिखानाची दखल राज्य शासन घेत असून पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार दिले जातात. कोल्हापूर माहिती विभागातील कोल्हापूर,सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी आपण वर्षभरात केलेल्या लिखानाचे उत्कृष्ट पध्दतीतीने मांडणी करुन त्यांचा तीन प्रतीत प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी दि. 19 जुलै 2025 पर्यत सादर करावा,असे आवाहन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे. 

       माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका 31 जानेवारी 2025 रोजी पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका पाठविण्यास 19 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व  www.maharshtra.gov.in   तसेच https://mahasamvad.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…