no images were found
‘जगधात्री’मध्ये सोनाक्षी बत्रा आणि फर्मान हैदर मुख्य भूमिकांमध्ये
भारतभरात असंख्य स्त्रिया अशा लढाया लढत आहेत ज्या जगाला दिसत नाहीत. काही लढाया ऑफिसमध्ये, काही वर्गात, तर काही स्वतःच्या घरातच, जिथे त्यांच्या आवाजाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तरीदेखील आजच्या स्त्रिया उभ्या राहतात, स्वतःची ओळख निर्माण करतात, जी कुणीही पुसू शकत नाही. झी टीव्हीची नवीन मालिका ‘जगधात्री’ याच भावनेतून जन्माला आली आहे. या मालिकेत एका मुलीची गोष्ट आहे जी घरीच दडपून टाकली जाते, दुर्लक्षित केली जाते; पण तीच मुलगी गुप्तहेर बनून गुन्हेगारीविरुद्ध धाडसीपणे लढते. जगातील काळ्या शक्तींशी सामना करताना ती एका वैयक्तिक मिशनचीही सुरूवात करते: आपल्या आईच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी आणि त्या घरात स्वतःची हरवलेली ओळख परत मिळवण्यासाठी, ज्या घराने तिला कधीही खरे मानले नाही.
टेलिव्हिजनवर एक नवीन जोडी आणत सोनाक्षी बत्रा मुख्य भूमिकेत ‘जगधात्री’ची भूमिका साकारणार आहे, तर फर्मान हैदर तिचा जवळचा कॉलेज मित्र म्हणून तिच्यासोबत दिसणार आहे.
जगधात्रीचे आयुष्य दुहेरी आहे. घरी ती अदृश्य, दबलेली, दुर्लक्षित आणि नावडती आहे. पण एजंट जे.डी. म्हणून ती निडर, चतुर आणि अजेय आहे. ती अशा विरोधाभासाचे प्रतिनिधित्व करते, जे अनेक स्त्रिया जगतात – कुटुंबाच्या नजरेत असहाय्य, पण स्वतःची खरी ताकद ओळखली की अजेय. मुलींनी काय करावे किंवा करू नये हे ठरवणाऱ्या सामाजिक बेड्यांना ती तोडते.
दुसऱ्या बाजूला, शिवाय हा देखणा आणि मजेशीर स्वभावाचा असला तरी मनात खूप वेदना दडवून ठेवतो. तो अनाथ आहे आणि जगधात्रीप्रमाणेच अनेकदा दुर्लक्षित होतो. पण जगधात्रीला शिवायचे मन इतरांपेक्षा चांगले कळते. त्यांच्या गुप्त मोहिमांमध्ये तो फक्त मित्र म्हणून नाही, तर एक निष्ठावान योद्धा आणि शांत आधार म्हणून तिच्या सोबत उभा राहतो. त्याचे धैर्य आपल्याला हे दाखवते की फक्त मित्र म्हणून नाही, तर एक निष्ठावान योद्धा आणि शांत आधार म्हणून साथ मिळाली तर स्त्रियांची ताकद आणखी वाढते.
सोनाक्षी बत्रा म्हणाली, “मला जगधात्रीची भूमिका साकारायला खूप आनंद होत आहे. ती फक्त एक व्यक्तिरेखा नाही तर दररोज स्त्रिया ज्या विरोधाभासामध्ये जगतात त्याचे प्रतिबिंब आहे. घरी तिला कोणी महत्त्व देत नाही, ती अदृश्य वाटते; पण जेव्हा ती एजंट जे.डी. म्हणून उभी राहते तेव्हा ती धाडसी आणि अडथळे न मानणारी बनते. ती त्या शांत शक्तीचे प्रतीक आहे, जिला अनेकदा कमी लेखल जाते, पण ज्यांच्यामध्ये समाजाची शक्ले तोडण्याची ताकद दडलेली असते.”
फर्मान हैदर म्हणाला, “शिवाय ही अशी व्यक्तिरेखा आहे, जो मनातून खूप दुःखी आहे. पण त्याची खरी ताकद त्याच्या एकट्याने लढण्यात नाही, तर जगधात्रीच्या पाठीशी न डगमगता, न बोलता धैर्याने उभे राहण्यात आहे. मला वाटतं तो त्या साथीदाराचे प्रतीक आहे जो प्रत्येक स्त्री ला मिळायला हवा — जो तिला झाकोळून टाकत नाही, तर तिच्या शक्तीला अधिक ठळक बनवतो.”
‘जगधात्री’ ही स्त्रियांच्या जगण्यासाठीची कहाणी आहे आणि ती त्या प्रत्येक स्त्रीसाठी उभी राहते जिला घराच्या आत आणि बाहेर अदृश्य अशा लढाया लढाव्या लागतात.