Home मनोरंजन ”यामध्‍ये स्त्री-पुरुष बदल नाही तर कला महत्त्वाची आहे”:आसिफ शेख

”यामध्‍ये स्त्री-पुरुष बदल नाही तर कला महत्त्वाची आहे”:आसिफ शेख

1 min read
0
0
42

no images were found

  ”यामध्‍ये स्त्री-पुरुष बदल नाही तर कला महत्त्वाची आहे”:आसिफ शेख

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक आसिफ  शेख यांनी त्‍यांच्‍या प्रभावी अभिनयासह लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या त्‍यांनी त्‍यांची अनुकूलता आणि मोहकतेच्‍या माध्‍यमातून स्‍वत:चा दर्जा स्‍थापित केला आहे. अनेक वर्षांपासून त्‍यांनी ३५० हून अधिक भूमिका साकारल्‍या आहेत, पडद्यावर विविधता सादर केली आहे. रोचक बाब म्‍हणजे यापैकी अनेक महिला पात्रांच्‍या भूमिका देखील आहेत आणि या भूमिका साकारण्‍याचे आव्‍हान अनेक कलाकार नाकारू शकतात. पण आसिफ शेखने यांनी लैंगिक बदलावर नाही तर कलेवर नेहमी लक्ष केंद्रित केले आहे. त्‍यांनी नुकतेच त्‍यांचा अनुभव, तयारी आणि अशा भूमिका पडद्यावर सादर करण्‍यासाठी घ्‍यावी लागणारी मेहनत याबाबत सांगितले. आपल्‍या भूमिकांबाबत सांगताना आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ”मालिका ‘भाबीजी घर पर है’ सुरू झाली तेव्‍हा माझ्या भूमिकांसंदर्भात अनेक संशोधन व विकास करण्‍यात आले. हळूहळू, टीमने माझ्यासाठी विविध पात्र व लुक्‍सची रचना करायला सुरूवात केली आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव करत प्रतिसाद दिला. मी माझे दिग्‍दर्शक व लेखकांचे आभार व्‍यक्‍त करतो, ज्‍यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या संधी दिल्या. आतापर्यंत, मी ३५० हून अधिक भूमिका साकारल्‍या आहेत आणि त्‍यापैकी ३५ हून अधिक भूमिका २१ ते ८० वर्ष वयोगटातील महिलांच्‍या आहेत. अशा कोणत्‍याही भूमिका साकारण्‍यासाठी मी नेहमी प्रथम विविधतांना प्राधान्य देतो, ज्या खास असतात आणि त्‍यांचा प्रेक्षकांवर प्रभाव पडेल. माझ्या टीमच्‍या मदतीने आम्‍ही पोशाख व मेकअपकडे जाण्‍यापूर्वी संशोधन करतो, संदर्भ घेतो आणि स्‍केच तयार करतो. लुक निश्चित झाल्‍यानंतर आम्‍ही भाषा, वृत्ती आणि देहबोली ठरवतो. शेवटी, मी भूमिकेमध्‍ये सामावून जात परफॉर्म करतो. ही माझी प्रक्रिया आहे आणि मला अशा विविध भूमिका सादर करण्‍याची संधी मिळाल्‍याने नशीबवान वाटते.”  

आपल्‍या अनुभवाबाबत अधिक सांगत ते पुढे म्‍हणाले, ”माझ्यासाठी भूमिका साधी-सोपी असते. पुरूष असो किंवा महिला, काहीही फरक पडत नाही, अशा भूमिका वास्‍तविक रूपात सादर करणे महत्त्वाचे असते, कारण माझा विश्वास आहे की स्त्री-पुरुष बदल नाही तर कला महत्त्वाची आहे. असे असले तरी महिलेची भूमिका साकारण्‍यासाठी खूप मेहनत घ्‍यावी लागते हे मी नाकारू शकत नाही. पोशाखापासून मेकअपपर्यंत संपूर्ण परिवर्तन प्रक्रियेला अनेक तास लागतात. मला आठवते की, प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरलेल्‍या एका एपिसोडमध्‍ये महिलेची भूमिका साकारण्‍यासाठी मला तयार होण्‍यास जवळपास अडीच तास लागले होते. या गेट-अपसाठी संयम व समर्पिततेची गरज असते, विशेषत: शूटिंग दिवसभर असल्‍यास खूप लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. पण मी या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतो.”  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…