no images were found
आजच्या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
मुंबई : १७ ऑगस्टपासून सुरु असलेल्या राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार यांच्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनातील कालच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या गोंधळामुळे राजकीय वातावरण ढवळले गेले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की आणि उत्तर यांचा गोंधळ उडाल्याने राजकीय वातावरण तापले गेले आहे. आज होणाऱ्या अधिवेशनामध्ये राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा, सुव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवरुन विरोधक शिंदे- फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून काल झालेल्या गोंधळाचा परिणाम आजच्या अधिवेशनात दिसून येऊ शकतो. यामुळेच आजचे अधिवेशन कशापद्धतीने पार पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेले आहे.