no images were found
अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट पाडण्याचे केंद्र सरकारचे आदेश
मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या मागे ज्यासाठी ईडीची चौकशी मागे लागली ते रिसॉर्ट अखेर तोडण्यात येणार आहे. दापोली येथे असलेल्या या साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालायाने अखेर दिले आहेत.
सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला ३७ लाख ९१ हजार २५० रुपये तर साई रिसॉर्टला २५ लाख २७ हजार ५०० रुरये दंड ठोठावण्यात आला आहे. पर्यावरण तज्ञांच्या टीमने दापोलीतील मुरूड येथील या दोन्ही रिसॉर्टची पाहणी करून यासंबंधीचा आहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. या आहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २२ ऑगस्टला महाराष्ट्र कोष्टल मॅनेजमेंट अथॉरिटीचे सदस्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवलं आहे.