
no images were found
अंगद हसीजाचा ‘कैसे मुझे तुम मिल गये’ या मालिकेमध्ये प्रवेश
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ही दोन परस्परविरोधी स्वभावांच्या व्यक्तिरेखा अमृता (सृती झा) आणि विराट (अर्जित तनेजा) यांच्यातील अशक्यप्राय वाटणारी कथा आहे. अमृता एक सकारात्मक विचारांची साधी महाराष्ट्रीय मुलगी असून आयुष्यात सुयोग्य जोडीदार मिळाल्यानंतर आपले लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अशा विचारांची ती आहे, तर दिल्ली स्थित पंजाबी मुंडा विराटचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडालेला आहे आणि त्याच्या मते बहुतेक आधुनिक मुली ह्या पैशांच्या मागे असतात.
आगामी एपिसोड्समध्ये ह्या मालिकेत नवीन व्यक्तिरेखा अभिराजच्या प्रवेशाने रोमांचक नाट्यमय वळणे येतील. ही व्यक्तिरेखा गुणी अभिनेता अंगद हसीजा साकारणार आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये ही मालिका सातत्याने सर्वच स्तरांतील प्रेक्षकांना आपलीशी वाटलेली असून आपल्या रंजक कथानक आणि जबरदस्त परफॉर्मन्सेससह ह्या मालिकेने मोठे यश संपादन केले आहे. आणि अभिराजच्या प्रवेशासह ही मालिका एक नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांना भावनांची रोलरकोस्टर राईड आणि अनेक खुलासे पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची उत्कंठा अतिशय वाढेल.
अंगद हसीजा म्हणाला, “‘कैसे मुझे तुम मिल गये’ च्या कलाकारांसोबत काम करायला सुरूवात करताना आणि माझी व्यक्तिरेखा अभिराजच्या अंतरंगात शिरताना मी अतिशय उत्साहात आहे. ही व्यक्तिरेखा स्वीकारताना मी अजिबात विचार केला नाही. अभिराज हा विराटचा चुलत भाऊ असून तो नुकताच मुंबईला आला आहे. मी फार खोलात शिरू शकत नाही पण त्याच्या व्यक्तिरेखेला निश्चितपणे अनेक स्तर आहेत, जे हळूहळू उलगडतील आणि नक्कीच तुम्हांला तुमच्या खुर्च्यांना खिळवून ठेवतील. अमृता आणि विराटच्या आयुष्यात नाट्य निर्माण करण्यासाठी अभिराजचा प्रवेश झाला आहे आणि त्याच्या उपस्थितीने ह्या मालिकेमध्ये अनेक नाट्यमय वळणे येतील. माझ्या मते ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आव्हानात्मक असून सुरू मालिकेत शिरणे आणि प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवायला वेळ लागतो. पण मला ऑनस्क्रीन एवढ्या ताकदीची भूमिका साकारायची संधी मिळाली यासाठी मी आभारी आहे.”
सृती आणि अर्जित यांनी अनुक्रमे साकारलेल्या अमृता आणि विराट यांच्या भूमिकांनी निश्चितपणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन व्यक्तिरेखा अभिराजची भूमिका कथानकामध्ये उलगडत असताना ही मालिका आणखी रोचक बनेल आणि आता पुढे काय होईल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिल.