Home क्राईम गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

0 second read
0
0
156

no images were found

गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

कोल्हापूर :  सणासुदीमध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसत आहेत. मालेगावमध्ये अशीच एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळ्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील मालेगावात ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरातील लोक झोपेत असताना चोरट्यानी कडी कोयंडा उचकटला आणि घरात प्रवेश केला. अरुण चौगले यांच्या घरी ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा घरातील लोक झोपले होते. याचाच चोरट्यांनी फायदा घेत आपला डाव साधला.अरूण चौगले हे कामावरून घरी परत आले. आणि यानंतर त्यांनी आपल्या घरातील सदस्यांना फोन केला. त्यांचा आवाज ऐकल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान, चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यानी घरातील तिरोजीवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…