Home मनोरंजन ‘इक कुडी पंजाब दी’मधील अविनेश रेखी

‘इक कुडी पंजाब दी’मधील अविनेश रेखी

0 second read
0
0
33

no images were found

‘इक कुडी पंजाब दी’मधील अविनेश रेखी

 

झी टीव्हीवरील मालिका – ‘इक कुडी पंजाब दी’ मधील भरपूर नाट्‌याने शक्तीशाली कथानक आणि चांगल्या प्रकारे लिहिलेल्या व्यक्तिरेखांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाबच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या ह्या शोमधून ताकद आणि चिवटपणा दिसून येतो. प्रेक्षकांनी पाहिले की रांझा अविनेश रेखी ह्या मालिकेतील आपल्या प्रियजनांना सांभाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. अविनेश स्वतःही रांझासारखाच आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना अविनेश रेखी म्हणाला की परिवारासाठी मूल्ये महत्त्वाची आहेत आणि घरातील प्रत्येक सदस्यासोबत चांगले नाते राखणेही अतिशय जरूरी आहे.

मला वाटतं प्रेम आणि समजूतदारपणावर आणि सगळ्‌यात महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंधांमधील गैरसमजुती टाळण्यासाठी एकमेकांशी गोष्टी शेअर करण्यावर एक यशस्वी कुटुंबव्यवस्था टिकून असते.
परिवाराच्या कुठल्या सदस्यासोबत तू सगळ्‌यात निकट आहेस? त्या व्यक्तीचे कुठले गुण तूला आवडतात? त्या व्यक्तीसोबत हृदयाला स्पर्श करणारा असा कुठला क्षण तू व्यतीत केला आहेस?
मला वाटत नाही की मी ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन कारण माझ्या परिवारातील सर्वांसोबतच मी अगदी समान पद्धतीने निकट आहे, मग ती माझी आई असो, वडिल असो, बायको किंवा मुले. त्या प्रत्येकासोबत माझे खास नाते आहे आणि माझे त्या सर्वांवर अगदी बिनशर्त प्रेम आहे.
माझ्या कुटुंबाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्‌य म्हणजे आम्ही एकमेकांसोबत दोस्तांसारखे राहतो. एकमेकांसोबत सगळ्‌या गोष्टी शेअर करतो आणि आमचे असे नाते आहे की जिथे बाप–बेटा किंवा वडिल–मुलगी असी नाती नसून मी माझ्या मुलांचा दोस्त आहे आणि माझे आईवडिल माझे दोस्त आहेत. माझी पत्नी आणि माझेही मित्रत्वाचे नाते असून आमच्या मूळ नात्याआधी आमचे हे नाते येते.
मी जेव्हा चित्रीकरण करतो, तेव्हा मी त्यांना फक्त रात्रीच भेटतो. पण जेव्हा मी चित्रीकरण करत नसतो तेव्हा मी अख्खा वेळ त्यांच्यासोबतच असतो. एक परिवार म्हणून जमेल तेवढा समय एकमेकांसोबत व्यतीत करण्यामध्ये आमचा विश्वास आहे.
माझे कुटुंब माझ्यासाठी सगळ्‌यात महत्त्वाचे आहे, असा काही खास क्षण नाही जेव्हा मला त्यांचे महत्त्व कळले कारण काही गोष्टी आंतरिक असतात. मी एक पारिवारिक व्यक्ती आहे आणि ज्याप्रकारे मी माझ्या आईवडिलांसोबत राहिलो अगदी तसेच माझ्या मुलांनी आणि कुटुंबियांनी माझ्यासोबत राहावे अशी माझी इच्छा आहे.
आपला जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत बातचीत करताना किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेताना ते शांतपणे करणे हे तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्ही करायला हवे. जेव्हा कधी तुम्हांला एकमेकांचे पटत नसेल तेव्हा आपल्या अहंकाराला त्यामध्ये कधीच आणू नये. नकारात्मक गोष्टींना योग्य पद्धतीने हाताळावे. आपली नाती राखताना आणि त्यांचे संवर्धन करताना ह्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी.
डिनरसाठी बाहेर जा, एकमेकांसोबत पारदर्शक राहा, दोस्तांसारखे जगा, एकमेकांसोबत खेळा, एकमेकांना समजून घ्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर प्रेम करा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…