no images were found
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये पहा ‘राम कथा’
२३ व २४ जानेवारी रोजी एण्ड टीव्हीवरील मातिका ‘अटल’च्या आगामी एपिसोडमध्ये लक्षवेधक ‘राम कथे’चा अनुभव घेण्यास सज्ज राहा. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या गाथेला सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेली ही मालिका प्रेक्षकांना आगामी एपिसोडमधील लक्षवेधक कथानकासह रामायण युगामध्ये घेऊन जाणर आहे. या लक्षवेधक ‘राम कथा’ कथानकामध्ये पंडित घराण्यामधील अटल त्याच्या दादाजींसोबत जवळच्या गावात राम कथा पठण करण्यास जातो. कार्यक्रम सुरू असताना दादाजी श्याम लाल वाजपेयी (मिलिंद दस्ताने) आजारी पडतात, ज्यामुळे कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतो. पण काहीही संकोच न करता यंग अटल (व्योम ठक्कर) मंचावर येतो आणि त्याच्या अद्वितीय शैलीमध्ये राम कथा सादर करू लागतो. हे पाहून उपस्थित सर्व लोक त्याची भरभरून प्रशंसा करतात. गायक सेंजुती दास व निशांत पांडे, संगीतकार निशांत राजा आणि गीतकार अमित शर्मा यांनी एकत्र येत हे विशेष गाणे तयार केले आहे. या गाण्यामधून भगवान श्रीराम वनवासाला (जंगलात) निघाले तेव्हाच्या मार्मिक क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे, ज्यामुळे गाण्यामधील भावार्थ उंचावला आहे.
या विशेष एपिसोडबाबत सांगताना श्याम लाल वाजपेयी (मिलिंद दस्ताने) म्हणाले, ”अटलचे वडिल कृष्णा बिहारी (आशुतोष कुलकर्णी) यांना पैशांची अडचण जाणवू लागते आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे अटल व त्याच्या कुटुंबाला प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागतो. दरम्यान, राम कथा सांगण्याची संधी चालून येते, जेथे पंडित दादाजी यांना जवळच्या गावामध्ये कथेचे पठण करण्याचे आमंत्रण मिळते. अटल देखील त्याच्या दादाजींसोबत जातो. अचानक दादाजी आजारी पडतात, अटल त्याच्या अद्वितीय शैलीमध्ये राम कथा पठण करतो आणि सर्वांची प्रशंसा मिळवतो. पण ब्रिटीश अधिकारी व त्याची टीम या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणतात. संस्कृतीप्रती कटिबद्ध असलेला अटल हस्तक्षेप करतो आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांना रामायणाची शिकवण सांगतो. कथानकाला रोमांचक वळण मिळते, जेथे विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याचे मन बदलते, तो रामायणाच्या कालातीत प्रभावाकडे आकर्षित होतो, आदराने वागू लागतो आणि राम कथेप्रती प्रशंसा व आदर व्यक्त करतो. अटलची सांस्कृतिक मूल्यांप्रती भूमिका संस्कृतींप्रती समज निर्माण करण्यासाठी, महाकथेचा वैश्विक प्रभाव निर्माण करण्यासाठी उत्प्रेरक ठरते.”