
no images were found
शहरातील 2 कोटी 29 लाखाच्या विविध विकास कामांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची मंजूरी
कोल्हापूर : शहरामध्ये विविध विकास योजेनमधून 2 कोटी 29 लाख 61 हजार 492 रुपयाच्या विविध विकास कामांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते डांबरीकरण, गटर्स, चॅनल, क्रॉसड्रेन व क्रॉक्रीट रस्ते करणे या कामांचा समावेश आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक 61 अंतर्गत प्रभागातील रस्त्यावरील गॅस वाहिनी भूमिगत करण्याकरीता केलेल्या खुदाईचे ठिकाणी डांबरीकरण (रिस्टोरेशन) करणेकामी रक्कम रु.25 कोटी 06 लाख 492 रुपये, प्र.क्र.65 ई वॉर्ड राजेंद्रनगर झोपडपट्टी बंकश मुल्लाणी ते शिवराम बुध्दीहाळकर व आराम धट्टी ते रमेश काळे गटर चॅनेल करणे व सौदागर दुकान समोरील क्रॉसड्रेन करणेकामी रक्कम रु.31 लाख 55 हजार. प्र.क्र.37 राजारामपूरी 11 वी गल्ली मांडवकर घर ते नीलगंगा अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणेकामी रक्कम रु.30 लाख. प्र.क्र.39 मधील शाहू जलतरण तलाव येथे सुरेश कदम घर ते संजय देसाई घर रस्ता पेव्हरने डांबरी करणेकामी रक्कम रु.30 लाख. प्र.क्र.7 सर्किट हाऊस येथील मनीष पार्क ते किरण जोशी घर ते देशामाने कॉलनी रस्ता डांबरी करणेकामी रक्कम रु.38 लाख. प्र.क्र.12 नागाळा पार्क येथील वारणा कॉलनी रस्ता डांबरी करण करणेकामी रक्कम रु.30 लाख. प्र.क्र.19 अंतर्गत मुक्त सैनिक वसाहत अंतर्गत प्रिन्स विद्यामंदीर ओपन स्पेस बंदिस्त करणे, प्र.क्र.20 छ.शाहू मार्केट यार्ड अंतर्गत इंदु गॅरेज ते पाडकर घर काँक्रिट कामी रु.45 लाख. प्र.क्र.8 भोसलेवाडी कदमवाडी अंतर्गत भोसलेवाडी चौक ते महादेव मंदीर रस्ता डांबरीकरण करणेकामी रक्कम रु.50 लाख मंजूर करण्यात आले आहेत.