no images were found
मुख्यमंत्री यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
कोल्हापूर (प्रतिनीधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले आहे. गेल्या सहा महिन्यात शिवसेनेचे कोल्हापुरात झालेले सर्व कार्यक्रम शिवसैनिकांनी यशस्वी केले आहेत.त्याचमुळे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.२८ जानेवारी रोजी शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, दि.२९ जानेवारी रोजी शिवसंवाद मेळाव्या अंतर्गत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा पार पडणार आहे. याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाली असून, शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसंवाद दौरा आणि राष्ट्री अधिवेशनाच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन व आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीच्या सुरवातीस बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेतील क्रांतीनंतर कोल्हापूरचे निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी आणि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी राहिले. कोल्हापुरातील प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केला. याची चर्चा राज्यभर झाली. त्यामुळे आगामी कार्यक्रम महत्वाचा असून शिवसेना पक्षाला नवी दिशा देणारा आहे. कोल्हापुरात हे अधिवेशन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला हा आपल्यासाठी मानाचा निर्णय आहेच, यासह या निर्णयातून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा कोल्हापूरच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर असलेला विश्वास सिद्ध होतो. कोल्हापुरातील या राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. कोल्हापुरात होणारा आगामी कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमांना तोडीस तोड असा झाला पाहिजे आणि याचा परिणाम राज्याच्या राजकीय क्षेत्रात उमटला पाहिजे. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे, अशा सूचना देत या कोल्हापुरातील अधिवेशन आणि सभा यशस्वी करण्याची ग्वाही दिली.
यानंतर बोलताना शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार मा.श्री.श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार कोल्हापुरात शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने कार्यक्षम अस नेतृत्व राज्याला लाभल असून, मा.श्री.शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रात येत आहे. राज्याच्या कारभारासोबतच शिवसेना संघटना बांधणीकडे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असून, राज्यभरातील सभा झाल्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन आणि सांगता सभा पार पडणार आहे. याकरिता नियोजन अंतिम टप्प्यात असून, अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नियोजनाच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर देण्यात येणार आहे. शिवसेनेचे पहिलं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यासाठी राज्यातील इतर जिल्ह्यातूनही मागणी करण्यात आली होती परंतु मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरलाच पहिलं अधिवेशन घेण्याचा निर्णय दिला. याठिकाणी होणारे अधिवेशन यशस्वी होईल याची खात्री मा.ना.शिंदे साहेबांना आहे. त्यामुळे दिलेल्या जबाबदारी प्रमाणे कुठेही कमी न पडता काम केल्यास हे भव्य दिव्य आणि पक्षाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना शिवसेना सचिव संजय मोरे यांनी, कोल्हापुरात अधिवेशन होत असल्याने कोल्हापूर हे अधिवेशनाचे यजमान असतील. त्यामुळे यजमानांवर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी असणार आहे. आगामी सर्वच निवडणुकीच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची प्रतिमा आणि ताकद तयार करण्याची संधी आपणांस मिळणार आहे. शिवसेना हि शिस्तबद्ध संघटना आहे त्यामुळे होणार अधिवेशनही शिस्तबद्ध होणे गरजेचे आहे. त्याकरिता नियोजनबद्ध काम सर्वांना कराव लागणार आहे. या अधिवेशनाचा फायदा आगामी निवडणुकात पक्षाला होणार आहे. निवडणुकांमध्ये होणाऱ्या कामकाजाची ही रंगीत तालीम असणार असून, कोल्हापूरचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. होणाऱ्या कार्यक्रमासाठी दोन्ही दिवस मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्यासह शिवसेनेचे राष्ट्रीय स्तरावरील नेते दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं, अशा सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना समन्वयक आशिष कुलकर्णी, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रवी माने, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.