
no images were found
मोफत रेशन योजना बंद : सप्टेंबरपासून बदल
सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी कोरोना काळात मोफत रेशन योजना सुरु केली होती. पण आता सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासून हा बदल लागू होणार आहे. 2020 मध्ये कोरोना काळात योगी सरकारने उत्तरप्रदेशमधल्या गोरगरीब जनतेसाठी मोफत रेशन योजनेची सुरुवात केली होती. पण आता योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मोफत रेशन योजना बंद केल्यानंतर रेशनकार्ड धारकांना गहु प्रतिकिलो 2 रुपये तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो दराने विकत घ्यावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून हा बदल लागू होणार आहे. योगी सरकारने ही योजना बंद केल्याने जवळपास 15 करोड लोकांवर याचा परिणाम होणार आहे. अंत्योदय कार्ड धारकांना 14 रुपये प्रतिकिलो गहु आणि तांदूळ 21 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा बदल अमलात येईल.