Home शासकीय महापालिके विरुद्धचे अपिल मा.जिल्हा न्यायालयाने फेटाळले

महापालिके विरुद्धचे अपिल मा.जिल्हा न्यायालयाने फेटाळले

1 second read
0
0
103

no images were found

महापालिके विरुद्धचे अपिल मा.जिल्हा न्यायालयाने फेटाळले

कोल्हापूर : नेचर इन निड (बी.एम.डब्ल्यु.टी) सर्व्हिसेस या संस्थेचे महापालिके विरुद्धचे अपिल मा.जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहे. तात्कालीन आयुक्तांनी महापालिका कायदयानुसार नेचर इन निड या संस्थेने करारातील अटी व शर्तीचा भंग केलेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

सातारा येथील नेचर इन निड या संस्थेस शहरातील जैव वैदयकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्प उभारणेसाठी कसबा बावडा ड्रेनेज प्लांट येथील 10,000 चौ. फुट जागा भाडे कराराने देण्यात आली होती. या संस्थेस महासभा ठराव क्र. 226 दि. 20/10/2011 ने या कामाची मान्यता दिलेली होती. तात्कालीन आयुक्तांनी महापालिका कायदयानुसार नेचर इन निड या संस्थेने करारातील अटी व शर्तीचा भंग केलेने व महापालिकेची कायदेशीर देय रॉयल्टी रक्कम रु.53,67,000/- थकीत असलेने संस्थेवर कारवाई केली होती. या कारवाईत महानगरपालिका कायदा कलम 81 बÉ” अन्वये  नेचर इन निड या संस्थेस (बायोमेडिकल वेस्ट मटेरियल) जैव वैदयकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्पातून बेदखल केले होते. आयुक्तांच्या या आदेशा विरूद्ध नेचर इन निड या संस्थेने कोल्हापूर जिल्हा न्यायाधिश यांचे कोर्टात महानगरपालिका अधिनियम चे कलम 81 एफ अन्वये म्युनिसिपल अपील दाखल केले होते.

संस्थेने महापालिके विरुद्ध दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी कोल्हापूर मा.जिल्हा न्यायाधिश सो. क्र.2, मा.एस.आर.साळुंखे यांचे समोर गुण दोषावर झाला. महापालिकेच्यावतीने वकील ॲड. प्रफुल्ल राऊत यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानून मा.जिल्हा न्यायाधिश मा.एस.आर.साळुंखे यांनी नेचर इन नीड या संस्थेचे महानगरपालिका विरुध्दचे अपिल नामंजुर केले. न्यायालयाच्या या आदेशामुळे नेचर इन नीड या संस्थेकडून महापालिकेची देय रक्कम वसूल करण्याचा मार्ग सोयीस्कर झाला असलेचे ॲड.प्रफुल्ल पटेल यांनी सांगीतले. याकामी उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मार्गदर्शन केले. तर इस्टेट ऑफीसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, विधी विभागाचे  विलास साळोखे यांनी सहाय्य केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान …