
no images were found
हस्तशिल्प सेवा केंद्रातर्फे टूलकिटचे वितरण
कोल्हापूर : विकास आयुक्त हस्तशिल्प वस्त्र मंत्रालय, हस्तशिल्प सेवा केंद्रातर्फे ३० कारागीर महिलांना हँड एम्ब्रायडरी टूलकिटचे वितरण निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांच्च्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालायातील ताराराणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, हस्तकला विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा एक स्तुत्य उपक्रम आहे.
जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला मिस्किन म्हणाल्या, ज्यावेळी महिला आत्मनिर्भर होतील, त्यावेळीच आत्मनिर्भर भारत होईल. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या कलागुणांना वाव द्या. प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा ब्रँड तयार करा.
कृष्णराज महाडिक म्हणाले, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ तयार होते, ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग होणे जरुरीचे आहे. त्यासाठी महाडिक परिवार नेहमीच मदतीसाठी तयार असेल.
हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग यांनी प्रास्ताविक केले. रितेशकुमार यांनी आभार मानले. यावेळी कारागिरांनीही मनोगत व्यक्त केले. बी. एस. चव्हाण, भारती मुडे, अनिलकुमार, शक्ती चिले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कारागीर उपस्थित होते.