no images were found
ED ची मोठी कारवाई; मुंबई, दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी छापे
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सकाळी मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याससंबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेनं (CBI) 17 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, हरियाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, महाराष्ट्रातील मुंबई, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यांत 30 हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे. सीबीआयनं नोंदवलेल्या एफआयआरनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री मनीष सिसोदिया यांना पहिला आणि मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. या प्रकरणात अनेक अज्ञात आरोपी, कंपन्यांसह एकूण 16 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. सीबीआयनं नोंदवलेल्या याच प्रकरणाचा ताबा घेत ईडी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्याची चौकशी करत आहे.