Home सामाजिक मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक अपघातात 3 जखमी

मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक अपघातात 3 जखमी

0 second read
0
0
202

no images were found

मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक अपघातात 3 जखमी

वाडीवऱ्हे :सोमवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला फाट्यावर ट्रक उलटून तीनजण जखमी झाले. नाशिककडून मुंबईकडे जाणारा लोखंडाने भरलेला ट्रक (एमएच ४६, एफ ६२०५) समसोनाइट कंपनीजवळ स्टेरिंगरॉड तुटल्याने ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातामध्ये ओम प्रकाशसिंग (वय २८), रफिक रहीम खान (वय ४५), दिलीपकुमार सिंग (वय ३९, रा. उत्तर प्रदेश) हे तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्ण्वाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अपघातातील जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …