no images were found
मुंबईत विशेष लोकलची सुविधा ‘गणेशविसर्जनपूर्वी करावी : जयंत पाटील
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारशी बोलून लोकलच्या फेऱ्या वाढवा असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. गणेश विसर्जनकाळात लोकलला रोजच्यापेक्षा अधिक गर्दी असल्याने प्रवाश्यांचे हाल होतात. विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे अनेक जण रस्त्यांऐवजी लोकलला प्राधान्य देतात. त्यामुळे गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.