‘धनगर’ समाजाला आरक्षण मिळवून देऊ – हेमंत पाटील मुंबई : राज्यातील धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी दिले. लवकरच ‘धनगर’ आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल,असा विश्वास देखील त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.आरक्षणाच्या मुद्दयावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती लड्ढा यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे.सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते हेमंत पाटील यांच्यावतीने धनगर आरक्षणासंबंधी २०० पानी पुरावे …