no images were found
अजित पवारांच्या वक्तव्याची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली
कोल्हापूर : “विरोधी पक्षात असताना अजित पवार असे बोलत असतात.”असे सांगत अजित पवारांचे विधान बेदखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळेल असे विधान केले होते. त्या विधानाची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच खिल्ली उडवली. दरम्यान हे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३०३ कोटीच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी अवाच्या सवा निधी निधी घेतला होता. अजित पवार यांनी ८० कोटी, दिलीप वळसे पाटील यांनी ४० कोटी रुपयांचा निधी घेतला होता. ज्यांनी ज्यांनी जादा निधी घेतला होता, त्यांचा निधी आपण निम्मा केला. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत भाजप आमदारांना कमी निधी दिला होता. यामुळे निधी वाटपात समतोल राखणे आवश्यक होते. 303 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूर जाताना विरोधी आमदारांचा निधी कुठेही कमी केला नाही. आपण विकासकामात राजकारण आणत नाही. सर्वांना समान न्याय हे आमचे धोरण आहे.”
गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले देशातील कोणत्याही राज्यात निवडणुका असो भारतीय जनता पक्ष म्हणून त्या निवडणुकी लढवितो. निवडणूक म्हणजे एका अर्थी युद्धच. या युद्धात कुठेही कमी पडणार नाही या पद्धतीने भाजपचे रणनीती असते.