
no images were found
शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचे विठ्ठलाला साकडे, सपत्नीक केली महापूजा
पंढरपूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते आज विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. फडणवसी यांनी सपत्नीक ही महापूजा केली. आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही शासकीय महापूजा संपन्न झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गुलाबराव साळुंखे, आणि कलावती साळुंखे या वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळाला. ते ५० वर्षांपासून वारी करत आहेत.
आषाढीच्या वारीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेऊन शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली. पण कार्तिकी एकादशीला कधी इथे येण्याचा योग आला नव्हता. तो योग यावेळी आला आणि ही पूजाही संपन्न करण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल खरंतर पांडुरंगाचेच आभार मानतो आणि मंदिर समितीचेही आभार मानतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
देशात ज्याप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कॉरिडॉर तयार झाले. त्या धर्तीवर नवीन आराखड्यानुसार आपण पंढरपूरचा विकास करणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विकास करणार आहोत. पंढरपूर वारीची कुठलीही परंपरा खंडी न होऊ देता आराखड्याचं काम हातात घेऊ, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण पांडुरंगाकडे पाहतो. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या विविध भागातून भाविक येत असतात. विशेषतः वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थाने भक्तीरसात लीन होऊन सश्रद्ध समाजाची निर्मिती केली. त्यामुळेच आज समाजतले जे संस्कार पाहतो आणि समाज सुव्यस्थीत काम करताना आपण पाहतो. असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आपण पांडुरंगाला साकडं घालूया, पांडुरंगाने आम्हाला आशीर्वाद द्यावा, महाराष्ट्रातल्या गोरगरीबांना, शेतकऱ्यांना आशीर्वाद द्यावा, आमच्या शेतकऱ्यांवर येणारी संकट दूर व्हावीत, आमचा शेतकरीही आणि कष्टकरीही सुजलाम सुफलाम व्हावा, हे सर्व करण्यासाठी आम्हाला शक्ती, आशीर्वाद आणि सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, संत नामदेव महाराजांच्या ७५२व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेलाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष नेमीनाथ महारज औसेकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, हरीभाऊ बागडे, बनन पाचपुते, समाधान अवताडे, गोपीचंद पडळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गुलाबराव साळुंखे, आणि कलावती साळुंखे या वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळाला. ते ५० वर्षांपासून वारी करत आहेत.