no images were found
भारतीय भाषांचे जतन व संवर्धन करणे महत्वाचे : प्रा.डॉ.रघुनाथ कडाकणे
कोल्हापूर : सध्या अनेक भारतीय भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.रघुनाथ कडाकणे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र व नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रसिद्ध कवी व स्वातंत्र्य सैनिक श्री.शुभ्रमनिया भारती यांच्या जयंती औचित्याने भारतीय भाषा उत्सवा निमित्त ‘भारतीय भाषा’ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे होते.
प्रा.डॉ. कडाकणे म्हणाले की, भारताचा विविधतेच्या बाबतीत विचार केल्यास तो निसर्ग समृद्धी,प्रादेशिक समृद्धी,आर्थिक,भाषिक आणि धार्मिक या मध्ये जशी विविधता आहे.तशी भाषेमध्ये सुद्धा विविधता आहे.प्रादेशिक भाषा मोठ्या प्रमाणात जपल्या जातात.त्यांच्याकडे अस्मिता व अभिमान म्हणून पाहिले जात आहे.भोगोलिक अभिनिवेश सोडून त्या पुढे गेल्यास फायद्याचे ठरणार आहे.माणसांचे स्थलांतर झाले तर भाषेचे व संस्कृतीचे स्थलांतर होईल.भाषा टिकविण्यासाठी भाषा शिकविण्याची व रोजगाराची संधी
उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची न करता व्यावहारिक करता आली पाहिजे.त्यासाठी भाषिक धोरण आखणे गरजेचे आहे.भाषा जिवंत राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.त्यातून भाषेचे पुर्नजीवन होऊन भाषेचे हस्तांतर करणे गरजेचे आहे.असे प्रा.डॉ. कडाकणे सांगितले. डॉ.मोरे म्हणाले, भारतीय भाषा जतन आणि संवर्धन केल्यास भाषा टिकण्यास मदत होणार आहे.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रास्ताविक समन्वयक डॉ.के.बी.पाटील यांनी केले.पाहुण्यांची ओळख डॉ.पी.बी.बेळीकट्टी यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.नितीन रणदिवे यांनी केले व आभार प्रा.डॉ.अरुण शिंदे यांनी मानले.
यावेळी नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्सचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.जे.फराटे, उपकुलसचिवडॉ.एस.एम.कुबल, श्री.सी.एस.कोतमिरे, नाइट कॉलेज मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.अरुण शिंदे, मराठी विषयाचे सहा.प्राध्यापक डॉ.पी.एस.लोंढे, इंग्रजीचे सहा.प्राध्यापक डॉ.पी.बी.बेळीकट्टी,हिंदी विषयाचे एस.वाय.चोपडे यासह विद्यार्थी उपस्थित होते.