Home आरोग्य मुलाच्या दंशाने कोब्रा सापाचा मृत्यू; मुलगा सुखरूप

मुलाच्या दंशाने कोब्रा सापाचा मृत्यू; मुलगा सुखरूप

0 second read
0
0
275

no images were found

मुलाच्या दंशाने कोब्रा सापाचा मृत्यू; मुलगा सुखरूप
रायपुर : छत्तीसगडमधील आठ वर्षाच्या मुलाने घेतल्याने कोब्रा सापाचा मृत्यू झाला आहे. पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा घातला. त्यानंतर या मुलाने सापापासून सुटका करुन घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. ज्यात सापाचाच मृत्यू झाला.

दिपक नावाचा हा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. ‘सापाने माझ्या हाताला विळखा मारला आणि हाताचा चावा घेतला. मी हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी दोन वेळा सापाला चावलो,’ या घटनेनंतर दिपकला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. त्याला सापाचं विष उतरवणारं औषध देण्यात आलं आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं, असं या आरोग्य केंद्रातील डॉक्टर जेम्स मिनीज यांनी सांगितलं. दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हते. त्याला साप चावला तरी त्याच्या शरीरामध्ये विष पसरलं नव्हतं. अशा पद्धतीने साप चावणे फार वेदनादायी असतं. यामध्ये फक्त ज्या ठिकाणी साप चावला आहे तिथेच वेदना होतात, अशी माहिती सर्पतज्ज्ञ कासीन हुसैन यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…