Home क्राईम हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मुंबई पोलिसांना निनावी फोन,

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मुंबई पोलिसांना निनावी फोन,

0 second read
0
0
119

no images were found

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मुंबई पोलिसांना निनावी फोन,
मुंबई: शहरातील हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला होता. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फोनवरील व्यक्तीने, मुंबईत १७ दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. हे दहशतवादी हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या या फोननंतर प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या फोननंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइट हा सर्व भाग पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. धमकीचा फोन काल (३ नोव्हेंबर २०२२) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला होता. तेव्हापासून पोलिसांचा तपास सुरु आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…