no images were found
शिर्डी अधिवेशनानंतर सरकार कोसळणार-जयंत पाटील.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ४ ते ५ नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा, हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आजी माजी आमदार, खासदार तसेच जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. त्यात विचारवंतांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहितीप्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
मध्यवधी निवडणुका केव्हाही लागु शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही शिर्डीत जाऊन स्नेही खासदार सुजय विखे यांना सांगणार आहोत की, एक अधिवेशन झाले होते तेव्हा सरकार पडले होते. आता आमचे शिर्डीतील अधिवेशन झाल्यानंतरही सरकार पडेल, असे भाकीत पाटील यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार झाला की ते दाखवून देतील. त्यांच्या गटातील नऊ ते दहा लोक विस्तारापर्यंत थांबतील, पण एवढा संयम त्यांनी बाळगला याचे कौतूक आहे. मध्यावधी निवडणुका लागतील असे वाटते, त्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपने टोळीबरोबर आघाडी केली. ही आघाडी फक्त एका गटासोबत आहे, पक्षाबरोबर नाही. त्यांचा उपयोग संपला की भाजप त्यांना नारळ देईल, त्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतीमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोल जयंत पाटील यांनी परिषदेत केला.
भिडेंचा निषेध करावा तितका कमी आहे. एखाद्या महिलेला असे बोलणे योग्य नाही. कोणत्याच व्यक्तीला हे न पटणारे आहे. कुंकू लावावे की नाही ते त्या महिलाचे वैयक्तिक प्रश्न आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.