no images were found
बिंदु चौक व रेल्वे स्टेशन येथे प्लॅस्टीक श्रेडर मशिन कार्यान्वीत
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरात बिंदु चौक पार्किंग व रेल्वे स्टेशन येथे प्लॅस्टीक श्रेडर मशिन बसवून कार्यान्वीत करण्यात आली आहेत. बिंदु चौक पार्किंग येथील या मशिनचा शुभारंग प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आला. शहरामध्ये अशी पाच ठिकाणी ही मशिन्स बसविण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहर हे एैतिहासिक शहर असलेने शहरात मोठया प्रमाणात पर्यटक येतात. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लॅस्टिक वेस्ट (मॅनेजमेंट ऍ़ण्ड हॅण्डलिंग) रुल्स केलेले आहेत. यानुसार महानगगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदीन निर्माण होणारा प्लॅस्टीक कचऱ्यासाठी प्लास्टिक श्रेडींग मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. या निरूपयोगी प्लास्टीक कचऱ्याचा रस्ते बांधणीचे कामामध्ये वापर करणेच्या अनुषंगाने हे श्रेडर मशिन बसविण्यात आले आहेत. हि मशिन्स शहरामध्ये बिंदु चौक पार्किग, महालक्ष्मीमंदिर परिसरात, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानक व रंकाळा चौपाटील या प्रामुख्याने वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येत आहेत. यापैकी बिंदु चौक व रेल्वे स्टेशन येथील मशिन सुरु करण्यात आली आहेत. हि मशिन खरेदी करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून 14 लाखाची तरतूद करण्यात आली होती. यासाठी 14 निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये बायोक्रुक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सर्वात कमी दराने रु.9.80 लाखाला पाच मशिन उपलब्ध करुन दिलेली आहेत. या मशिनद्वारे क्रशिंग होणारे प्लॅस्टीक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये करण्यात येणा-या रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, आरोग्य निरिक्षक मुनीर फरास व कर्मचारी उपस्थित होते.