Home उद्योग मारुती सुझुकीसोबत भारत बनतो आहे इलेक्ट्रिक. एक भारत, एक ईव्ही प्लॅटफॉर्म.

मारुती सुझुकीसोबत भारत बनतो आहे इलेक्ट्रिक. एक भारत, एक ईव्ही प्लॅटफॉर्म.

21 second read
0
0
29

no images were found

मारुती सुझुकीसोबत भारत बनतो आहे इलेक्ट्रिक. एक भारत, एक ईव्ही प्लॅटफॉर्म.

     मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (मारुती सुझुकी) ने 13 चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि एग्रीगेटर्ससोबत सहकार्य करारांवर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि ईव्ही श्री. हिसाशी ताकेउची आणि वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, विपणन आणि विक्री श्री. पार्थो बॅनर्जी आणि चार्ज पॉइंट ऑपरेटर्स मधील इतर वरिष्ठ मान्यवर.

      याप्रसंगी बोलतांना, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईवो श्री. हिसाशी ताकेउची म्हणाले,“मारुती सुझुकीमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना कायमस्वरूपी विश्वास निर्माण करण्यासाठी मालकीचा आनंददायी अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. आज, आम्ही एक ऐतिहासिक पाऊल उचलत आहोत, कारण आम्ही ईव्ही चार्जिंगच्या चिंता दूर करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी पूर्ण तयारीसह इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रात प्रवेश करत आहोत. आम्ही आमच्या विक्री आणि सेवा नेटवर्कमध्ये 1,100 हून अधिक शहरांमध्ये 2000 हून अधिक मारुती सुझुकीच्या विशेष चार्जिंग पॉइंट्सचे एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे. शिवाय, आम्ही देशभरात विस्तृत चार्जिंग पायाभूत सुविधांची उपलब्धता देण्यासाठी 13 चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्सशी सहकार्य केले आहे. सुझुकीच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत अशी आम्ही अनेक ईव्ही सादर करण्याची योजना आखत आहोत आणि याला पाठिंबा देण्यासाठी, 2030 पर्यंत संपूर्ण भारतात 1 लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्सचे नेटवर्क सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

      बळकट ईव्ही इकोसिस्टीबद्दल सांगताना, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे विपणन आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री. पार्थो बॅनर्जी म्हणाले, “आज भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी एका नवीन युगाची सुरुवात आहे. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, मारुती सुझुकी  ईव्ही देण्यासाठी तयार आहे आणि  ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधांबद्दलच्या प्रमुख समस्या दूर करणारे आमचे व्यापक नवीन प्लॅटफॉर्म तुम्हाला देऊन तुमच्यासोबत आहे. भारतातील सर्वात मोठे डीलर नेटवर्क आणि आमच्या चार्जिंग भागीदारांच्या नेटवर्कचा फायदा घेत, आम्ही भारतातील सर्वोत्तम 100 शहरांमधील प्रमुख ठिकाणी सरासरी 5-10 किलोमीटर अंतरावर  ईव्ही चार्जिंग पॉइंट्स असल्याची खात्री करत आहोत. आमच्या संभाव्य  ईव्ही ग्राहकांना देशभरात मोकळेपणाने ड्रायव्हिंग करता येण्यासाठी डीसी फास्ट चार्जरची देखील प्रमुख महामार्गांवर नियमित अंतराने व्यवस्था केलेली आहे. मनाला आणखी समाधान मिळण्यासाठी, आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी 1.5 लाख विशेष प्रशिक्षित  ईव्ही कर्मचारी कार्यरत आहेत. देशाच्या प्रत्येक भागात  ईव्ही मालकीला सपोर्ट करण्यासाठी विक्रीनंतरच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही 1100 शहरांमध्ये 1500+ ईव्ही साठी तयार असलेल्या कार्यशाळा देखील सक्रिय केल्या आहेत.”

     श्री. बॅनर्जी म्हणाले, “आम्ही केवळ बोलतच नाही, तर आम्ही या प्लॅटफॉर्मची क्षमता दाखवून देत आहोत, एक मूलगामी ‘ई ड्राइव्ह’ ची सुरुवात करून, जो मारुती सुझुकीच्या व्यापक  ईव्ही चार्जिंग नेटवर्कची वास्तविक-जगातील कार्यक्षमता दाखवून देईल. ‘ई ड्राइव्ह’ सह, आम्ही वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे आणि जलद  ईव्ही चा अवलंब करण्याचे ध्येय ठेवतो, कार्बनमुक्त राष्ट्र या देशाच्या शाश्वत ध्येयासाठी काम करतो.” 

       मारुती सुझुकी ‘ई फॉर मी’ ईव्ही चार्जिंग मोबाईल अॅप भागीदार-संचालित चार्जिंग पॉइंट्स आणि मारुती सुझुकीच्या स्वतःच्या ईव्ही चार्जिंग नेटवर्कवरून एकाच प्लॅटफॉर्मवर ईव्ही चार्जिंग पॉइंट्सचा सर्वसमावेशक वापर करण्यास सक्षम करते, ज्यामुळे रेझोरपे प्रस्तुत युपीआय किंवा विशेष ‘मारुती सुझुकी मनी’ द्वारे ईव्ही चार्जिंग आणि पेमेंटसाठी ग्राहकांना विना अडथळा प्रवास करता येतो. ई व्हिटारा बुकिंगच्या वेळेपासून, ‘ई फॉर मी’ अॅप व्हेईकल होम-चार्जर सेट करण्यासाठी आणि आवश्यकत तेवढा वापर निश्चित करण्यासाठी, सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्स शोधण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल, सोबतच या प्लॅटफॉर्मवर बरीच इतर वैशिष्ट्ये आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…