Home क्राईम मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0 second read
0
0
75

no images were found

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे मात्र मंत्रालयाला लावलेल्या संरक्षक जाळीमुळे मोठा अनर्थ टळला. हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहे. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने दिलेल्या जबाबामुळे काही काळ मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता.
आत्महत्येचा प्रयत्न कराणारा हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवर देखील आरोप केले आहेत. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या तरुणाने धक्कादायक दावा देखील केला आहे. माझ्या प्रेयसीवर बलात्कार करण्यात आला आहे. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना चार पत्र देखील लिहीली मात्र काहीही करण्यात आलं नाही, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…