Home राजकीय महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठकिला दोन्ही राज्यपालांचे आगमन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठकिला दोन्ही राज्यपालांचे आगमन

1 second read
0
0
194

no images were found

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठकिला दोन्ही राज्यपालांचे आगमन
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात मध्यस्थी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नांबाबत आज कोल्हापूरमध्ये मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मंथन बैठक होत आहे.या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच सीमाभागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कोल्हापूर शहरात ठीक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या बैठकीच्या माध्यमातून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर तोडगा निघणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन्ही राज्यांचे राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मंथन बैठक होत आहे. या बैठकीला दोन्ही राज्याचे राज्यपाल तसेच सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सहभागी होणार असून दोन्ही राज्यातील सीमा भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी काल रात्रीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे व्यापक आणि संयुक्त बैठक या आधी कधीच झाली नव्हती.

रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या बैठकीत या भागांतील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. अलमट्टी धरणात पाणी अडवल्यानंतर त्याच्या पुराचा फटका कोल्हापूर आणि सांगली बसतो, या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. मात्र याला महाराष्ट्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, करोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी अशा विविध समस्यांसंदर्भात या विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे.एक नोव्हेंबर १९५६ मध्ये केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव धारवाड विजापूर कारवार हे चार जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. यामुळे १९५६ पासून एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे मराठी भाषिकांना कडून काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव निपाणीसह अनेक गाव हे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कर्नाटक राज्याकडून हे जिल्हे महाराष्ट्रला देण्यास विरोध आहे. यामुळे बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड सरकार यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला आहे. तर महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह अनेक पक्ष बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…