
no images were found
शिवाजी विद्यापीठात संविधान दिन, शहीद दिन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज संविधान दिन आणि शहीद दिन या निमित्ताने भारतीय संविधानकर्ते आणि वीर शहीद जवान यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची मूळ प्रत यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी ’26/11′ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांसह अन्य शहीदांच्या स्मृतिप्रतिमांनाही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. डॉ. अमोल कुलकर्णी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, लोकसाहित्याचे अभ्यासक तारा भवाळकर, स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या वंदना खरे, डॉ.दिपक पवार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खडरेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. के. डी. सोनावणे, डॉ. पी. बी. बिलावर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.