no images were found
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
नटसम्राट,भुलभुलैय्या,हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, माहेरची साडी मधील भूमिका गाजल्या….
पुणे : नाटक,मालिका, वेबसिरीज आणि मराठी- हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाने रसिकांवर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. गेली १५ दिवसांपासून पुण्यातील मंगेशकर या रुग्णालयात यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवार सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.
त्यांच्या मागे पत्नी वृषाली गोखले आणि दोन मुली असा परिवार आहे. विक्रम गोखले हे गोखले घराण्यातील कला क्षेत्रात चौथी पिढीचे कलाउपासक होते. ते १९७० पासून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
गोखले यांनी मराठी साकारलेल्या प्रमुख भूमिकामध्ये कळत नकळत , मुक्ता , नटसम्राट , मी शिवाजी पार्क बोलतोय, मराठी- हिंदी सिनेमात ते एक विश्वसनीय चरित्र अभिनेता होते, ज्यांमध्ये सलीम लंगड़े पे मत रो ( मिल मजदूर च्या भूमिकेत होते), हम दिल दे चुके सनम (एक संगीत उस्ताद होते), भूल भुलैया (एक धार्मिक विद्वानाच्या भूमिकेत होते) ,अय्यारी (जनरल मॅनेजर )। मुकुल एस आनंद ( इंसाफ , अग्निपथ , खुदा गवाह) या सारख्या सिनेमात त्यांनी स्वाभावाने एक सच्चा व ईमानदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. २०१० मध्ये मुक्ता बर्वेंना घेवून बनवलेल्या आघात सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.श्री गोखले यांना 2013 मध्ये गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमति सिनेमा साठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त झाला. यामध्ये त्यांनी एका आजारी पत्नीच्या इलाजासाठी संघर्ष करणारा पती अशी भूमिका सकारली होती. गोखले यांना अलिकडच्या काळात आपण मिशन मंगल , निकम्मा या हिन्दी सिनेमात बघितले तर वेब सीरीज अवरोध द सीज विदिन पहायला मिळाले. निखिल महाजन यांच्या नुकतेच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या मराठी सिनेमात त्यांनी स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती.