
no images were found
पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी वातावरण राहील
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या पाऊस होत आहे. या पावसामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या भागात काहीप्रमाणात ढगाळ वातावरण तर काही भागांत हलक्या सरी देखील पडल्याचे चित्र आहे. या पार्श्व्भूमिव्त पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात हलक्या प्रमाणात थंडी राहील. २० आणि २१ नोव्हेंबरला राज्याच्या सर्वच भागातील तापमानात ४ ते ६ अंशांनी घट झाल्याने कडाक्याची थंडी होती. तसेच दक्षिणेकडील राज्यात पावसाळी /ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र तसेच कोकण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होऊन थोड्याप्रमाणात उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे.