Home राजकीय महाराष्ट्राचे माजी मंत्री भारत जोडो यात्रेत जखमी

महाराष्ट्राचे माजी मंत्री भारत जोडो यात्रेत जखमी

0 second read
0
0
115

no images were found

महाराष्ट्राचे माजी मंत्री भारत जोडो यात्रेत जखमी

सध्या पक्ष बळकटीकरणासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रे दरम्यान किरकोळ धक्क्यामुळे कोसळून माजी मंत्री नितीन राउत जखमी झाले.

पक्ष बळकटीकरणासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांन भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या  भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राउत हजर होते. ते हैदराबाद येथे सहभागी झाले असताना त्यांना अज्ञाताचा धक्का लागून ते कोसळले. कोसळल्यामुळे जखमी झाले. राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीमधून पुढे मार्गक्रमण करत असताना कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली कोसळले. तोल जाऊन ते खाली कोसळल्यामुळे त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ मुंबई/कोल्हापूर,…