Home शासकीय विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकपदी डॉ. प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती

विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकपदी डॉ. प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती

1 second read
0
0
122

no images were found

विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकपदी डॉ. प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी संचालकपदी डॉ. प्रकाश तुकाराम तथा पी.टी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. पी.टी. गायकवाड हे गेली २८ वर्षे उच्चशैक्षणिक विशेषतः क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ काम पाहिले आहे. तसेच अधिविभाग प्रमुख आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तत्पूर्वी त्यांनी वाळवा येथील क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालयातही शारिरीक शिक्षण संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वैयक्तिक व सांघिक गटांत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

आज दुपारी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या विद्यार्थीभिमुखतेचा आणि अनुभवाचा लाभ विद्यार्थी विकास विभागाला होईल, अशी अपेक्षा प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष…