Home क्राईम कार्यालयात लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कार्यालयात लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

0 second read
0
0
112

no images were found

कार्यालयात लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर : २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.३१ ऑक्टोबर) सायंकाळी शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे लोहार यांचा गैरकारभार उघडकीस आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये लोहार यांची तेरा महिन्यापूर्वी बदली होऊन आले होते. यापूर्वी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे त्यांनी काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद येथील त्यांचे कामकाज वादग्रस्त ठरले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कामकाजावर टीकाही झालेली होती. त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. या कारवाईच्या विरोधात लोहार यांनी कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती. याचवेळेस सोलापूर जिल्हा परिषदमध्ये लोहार यांची बदली झाली.  एका शाळेकडून वर्गवाढीच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग वाढविण्यासाठी परवानगी प्रस्तावात मागितली होती; याच कामासाठी लोहार यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती. संबंधित तक्रारदारांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. सोमवारी, सायंकाळी लोहार यांनी त्या तक्रारदाराला कार्यालयात बोलाविले होते. २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५…