
no images were found
नाशिकमध्ये आग लागून शिवशाही बस खाक
नाशिक : राज्यात शिवशाही बसला आग लागल्याच्या घटना गेल्या दोन दिवसात दोनदा घडल्या. आज नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग लागली. काल पुण्यात शिवशाहीनं गर्दीच्या ठिकाणी पेट घेतला होता. अशा घडणाऱ्या घटनांमुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑडिट करण्याची मागणी केली जात आहे. माळवाडी (नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर भाग) येथे शिवशाही बसला आग लागली. आज सकाळी शिवशाही बसला आकस्मिक मागील बाजूने आग लागली. बसने मागील बाजूने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्वरित बस थांबवून चालकाने आतील प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्यामुळे हानी टळली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने बस बाजूला घेऊन उभी केली. चालकाच्या सतर्कतेमुळे अनेकजणांचे जीव वाचले.