Home Uncategorized टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

1 second read
0
0
4

no images were found

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : दानशूर व्यक्ती, संस्थांनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना मदत करण्याचे आवाहन

कोल्हापूर, : उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावीपणे व परिणामकारक वापर करुन टीबी मुक्त भारत अभियान अधिक गतीने व सातत्यपूर्ण पद्धतीने राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पोषण आहार कीट वितरणामधील उत्कृष्ट कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व दानशूर व्यक्ती व संस्थांनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार कीटची मदत करण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहुजी सभागृहात आयोजित टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रथम बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. बैठकीला समितीचे सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा परिषदेचे अविनाश मेश्राम, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.दीपक मेंढेकर, वैद्यकीय अधिकारी (डी.टी.सी.,कोल्हापूर) डॉ.तेजल जाधव, डॉ.भूषण मिरजे, माय युवा भारत कार्यालयाचे समन्वयक गणेश भोसले व जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व संबधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व ग्रामपंचायत विभागांमध्ये एकत्रित समन्वय साधून जास्तीत-जास्त ग्रामपंचायती टीबी मुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत एम.डी.आर.वॉर्ड लवकरात लवकर सुरु करा, जेणेकरुन एम.डी.आर. टी.बी. (औषधाला दाद न देणारा क्षयरोग झालेला रुग्ण) झालेल्या रुग्णांना तात्काळ व सुलभरीत्या सेवा मिळेल. सी.पी.आर.हॉस्पिटल अंतर्गत अनुदानातून सी.बी.नॅट मशीन उपलब्ध करा. सामुदायिक जनजागृती प्रचार-प्रसार व क्षेत्रीय सनियंत्रण बळकट करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक (एन.सी.सी.) चे 5 स्वयंसेवक व माय युवा भारत चे 5 स्वयंसेवक नेमावेत.

टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर एक वर्ग एक अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करुन त्यांनी ब्लॉक स्तरावरील टीमवर सनियंत्रण करावे. एन.सी.सी. स्वयंसेवक व माय भारत स्वयंसेवक यांनी “निक्षय मित्र”म्हणून क्षयरुग्णांना सामजिक व मानसिक मदत करावी, क्षयरोगाबाबत जनजागृती करावी, आयुष्यमान आरोग्य शिबिरे व टी.बी. स्क्रीनिंग कॅम्प साठी मदत करावी तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वितरित करण्यासाठी मदत करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांनी सादरीकरणाद्वारे टीबी मुक्त भारत अभियानाबाबत व क्षयरोग कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन कोल्हापूर, : महाराष्ट्रातील थोर समाज…