Home मनोरंजन “सूर नवा ध्यास नवा”  रिऍलिटी शो मधील ऐतिहासिक पाऊल!! 

“सूर नवा ध्यास नवा”  रिऍलिटी शो मधील ऐतिहासिक पाऊल!! 

0 second read
0
0
141

no images were found

सूर नवा ध्यास नवा”  रिऍलिटी शो मधील ऐतिहासिक पाऊल!! 

रिऍलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा “ या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार, आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे रसिकप्रिय नि पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी आता आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन “सूर नवा “चा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे.  संगीतमय रिऍलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…