Home राजकीय पावसाळ्यानंतर शहरातील विकास कामांना गती द्या- आमदार अमल महाडिक यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

पावसाळ्यानंतर शहरातील विकास कामांना गती द्या- आमदार अमल महाडिक यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

2 second read
0
0
25

no images were found

पावसाळ्यानंतर शहरातील विकास कामांना गती द्या- आमदार अमल महाडिक यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी):-आमदार अमल महाडीक यांनी शहरातील विविध विकास कामांचा आज आढावा घेतला. यावेळी शहरामध्ये सुरु असलेल्या विकास कामांना गती देण्याचे निर्देश आमदार अमल महाडीक यांनी दिले. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अमल महाडीक यांनी शहरातील गाळेधारकांचा प्रश्न लवलरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यासाठी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करुन आवश्यकता भासल्यास शहरातील दोन्ही आमदांची संयुक्त बैठक 21 सप्टेंबर 2026 ला घ्यावी. अमृत 1 व अमृत 2 च्या कामांबाबत माहिती घेऊन ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत त्या ठिकाणी विरोध होत असल्यास त्या ठिकाणी मी स्वत: येऊन नागरिकांशी संवाद साधेन असे सांगितले. शहरामध्ये डांबरी रस्त्यांचा दर्जा व क्वॉलीटी सुधारण्यासाठी ठेकेदाराच्या कामावर संबंधित अधिका-यांची देखरेखी हवी. जे जे रस्ते खराब झाले आहेत व ज्या रस्त्यांचा दोष दायीत्व कालावधी आहे ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. शहरातील पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत परंतु त्या वापरात आणल्या का? तसेच ज्या टाक्या अपूर्ण आहेत त्या किती दिवसात पुर्ण कराणार? अशी विचारणा महाडिक यांनी केली. शहरातील स्वच्छतेसाठी कर्मचारी वर्ग अपूरा असल्याने याबाबत तोडगा काढा. उपनगरात बराचसा भाग मोठा आहे त्यामुळे स्वच्छता अपूरी होत आहे. गॅस पाईपलाईनची किती कामे अपूरी आहेत. राज्य शासनाच्या व महापालिकेच्या माध्यातून कामे गतीने पुर्ण करा. एक एक प्रोजेक्टचा मी स्वतंत्र आढावा घेणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढा, प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र खाऊ गल्ली करा जेणेकरुन मुख्य रस्ते व फुटपाथवार कोणीही बसणार नाही. शहरातील खाजगी कोचींग क्लासला परवानगी देण्यासाठी विशेष कॅम्प घ्यावा अशा सूचना केल्या.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील गाळ्यांबाबत सांगताना सन 2015 ते 19 या कालावधीतील गाळेधारकांचे व्याज माफ केले आहे. मटण मार्केट, फिश मार्केटचा गाळेधारकांचा विषय संपवून त्यांनी रक्कमाही भरल्या आहेत. अमृत 1 ची कामे अंतीम टप्यात असून लवकच ती पूर्ण होतील. अमृत 2 ची कामे करताना स्थानिक विराधामुळे कामे प्रलंबीत आहेत. रस्ते कामाबाबत ठेकेदाराचा कामाचा दर्जा नसल्यास संबंधीत ठेकेदास ब्लॅकलिस्ट करु. कोणत्याही ठेकेदाराचे काम करताना ते 3 वर्षे टिकले पाहिजे. सफाई कर्मचारी अपूरा पडत असल्याने आऊट सोर्सिंग 250 ते 300 कर्मचारी घेणार असून मुख्य रस्ते गटर्सची सफाई व कचरा संकलन याद्वारे केले जाणार आहे. महापालिकेचे सध्याचे कर्मचारी गावठाण व छोटया गल्यांमध्ये कामे करतील. शहरातील 12 टाक्यापैंकी 10 टाक्या पूर्ण झाल्या असून त्यातून पाणी पुरवठा सुरु केला आहे. उर्वरीत 2 टाक्या गणेश उत्सवापुर्वी पुर्ण करु. लिकेज काढण्यासाठी स्वतंत्र ठेकदार नेमण्यात येत आहे. गॅस पाईपलाईनच्या कामात फक्त 6 किलोमीटरची परवानगी कंपनीने पैसे भरले नसल्याने बाकी आहे. शहरातील पाणी चोरी राखण्यासाठी एनडीएस पथकाची नियुक्ती केली असून हे पथक मोटारी जप्त, अनाधिकृत कनेक्शनचा शोध घेईल. चारही विभागीय कार्यालयामार्फत खाऊ गल्लीची लोकेशन निश्चित करण्यात येईल. कोचींग क्लासमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी क्लासेस व लॉजींगला परवानगीसाठी व अग्शिमन यंत्रणा बसविण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करु. असे स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, निवास पोवार, मिलिंद जाधव, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा…