पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्रीचे निर्देश अमरावती : शेतीसाठी पीककर्जाची सोय शासनाने केली आहे. परंतु बँकांच्या जाचक अटींमुळे बळीराजाला पुन्हा एकदा खासगी सावकरांच्या दारात उभे केले आहे.यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही …