no images were found
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्रीचे निर्देश
अमरावती : शेतीसाठी पीककर्जाची सोय शासनाने केली आहे. परंतु बँकांच्या जाचक अटींमुळे बळीराजाला पुन्हा एकदा खासगी सावकरांच्या दारात उभे केले आहे.यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी असो वा नोकरदार असो त्यांनी बाहेरील कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतल्यास अथवा संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार झाल्यास त्याची संपूर्ण माहिती आता बँकांना “सिबिल”च्या माध्यमातून कळू लागली आहे. ती व्यक्ती कोणत्या बँकेची थकबाकीदार आहे, ज्याला जामीनदार आहे ती व्यक्ती कर्जाची नियमित परतफेड करते का, याचीही माहिती त्यामध्ये येते. कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले व नियमित परतफेड होत असेल, तर असा शेतकरी कर्जासाठी पात्र ठरतो. थकबाकी असलेल्यांना कर्जवाटप करता होत नाही.