
no images were found
WWE स्टार सारा लीचे निधन
नवी दिल्ली : वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटमधील माजी रेसलर सारा ली हिचे निधन झाले आहे. सारा फक्त ३० वर्षाची होती. साराच्या निधनाचे वृत्त तिच्या आईने सोशल मीडियावरून दिले. साराच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी दिली. WWEमधील या स्टार रेसरलचे निधन कसे झाले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. सारा लीच्या निधनावर एलेक्सा ब्लिस, बॅकी लिंच, मिक फोली या स्टार खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. WWE व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.
2016 मध्ये सारा लीने WWE मध्ये करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक सामने आत्तापर्यंत गाजवले आहेत. त्यामुळे ती सोशल मीडियावर अधिक प्रसिद्धीत असायची. सारा लीचं वय फक्त 30 असल्यामुळे चाहते खूपच अस्वस्थ होऊन कमेंटसच्या माध्यमातून तिला श्रध्दांजली वाहत आहेत. तिच्या चांगल्या मॅचचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. WWE व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त होत आहे.