Home क्राईम डॉ. पोळ हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर

डॉ. पोळ हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर

0 second read
0
0
113

no images were found

डॉ. पोळ हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर

सातारा : न्यायालयाने वाई हत्याकांड प्रकरणी महत्वाचा निकाल दिला आहे. सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ यानं केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयानं १ वर्षासाठी जामीन मंजूर केला आहे.

ती सहा वर्षांनंतर वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरनं ६ जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला होता. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं २०१६ मध्ये हे हत्याकांड उजेडात आणल्यानंर वाईसह सातारा जिल्हा हादरला होता. वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे; न्यायालयात ज्योती मांढरे हिच्या वतीनं तिला वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आता न्यायालयाने तिला काही अटी-शर्तीवर जामीन  मंजूर केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…