no images were found
दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या लाथार्थींनी हयातीचे दाखले 31 मे पूर्वी सादर करावेत
कोल्हापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाथार्थींनी हयातीचे दाखले दि. 31 मे 2023 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृहजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष किंवा zswo_kolhapur@maharashtra.gov.in या ई-मेल वर जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल राहुल माने यांनी केले आहे.
हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असेही कर्नल माने यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.