no images were found
संजय राऊत 10 जूनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश : नितेश राणे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे येत्या १० जूनपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या बैठकाही सुरू आहेत, असेही राणे म्हणाले.
महाराष्ट्र भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांना आता उद्धव ठाकरे खासदार करू शकणार नाहीत, अशी भावना आहे. अशा स्थितीत ते राष्ट्रवादीत आपले भवितव्य शोधत आहेत. येत्या दोन ते तीन आठवड्यांत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे. १० जून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा त्याच्या आधीच संजय राऊत हे राष्ट्रवादीत जातील. त्यासाठी बैठकाही सुरू आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची भूमिका काय होती, ते पाहा. राऊत हे त्यावेळी सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलत होते. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर राऊतांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी सुरू असल्याचेही राणे म्हणाले.